अहमदनगर (प्रतिनिधी):
तोफखाना पोलिसांनी वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या १३ हातगाडी चालकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे हातगाड्या लावून अडथळे निर्माण करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम २८३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईचे नेतृत्व निरीक्षक कोकरे व उपनिरीक्षक शेळके यांनी केले. ही मोहीम शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी राबविण्यात आली.
आरोपी चालकांमध्ये युसुफ शेख, इस्माईल बागवान, सुहेल कुरेशी, महेश पाथर, सय्यद अफ्फान व इतरांचा समावेश आहे. पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, सार्वजनिक ठिकाणी अडथळे दिसल्यास त्वरित माहिती द्यावी.
