युपीएससी परीक्षेत निफाडच्या प्रसाद आहेरची चमकदार कामगिरी – देशात ६३ वी रँक

निवाणे (ता. कळवण):
कळवण तालुक्यातील निवाणे गावाचा सुपुत्र प्रसाद श्रावण आहेर याने UPSC 2024 परीक्षेत देशात ६३ वी रँक मिळवून संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. त्याच्या यशामुळे गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

प्रसाद याचे शालेय शिक्षण श्रीराम शाळा, चांदवड येथे झाले, तर पुढील शिक्षण त्याने नाशिक येथील जिजामाता विद्यालयात घेतले. आयआयटी खरगपूर येथून अभियंता झाल्यानंतर, प्रशासनात सेवा देण्याच्या उद्देशाने त्याने UPSC चा अभ्यास सुरू केला.

त्याला २०२१ व २०२३ मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण करूनही अंतिम यादीत स्थान मिळाले नव्हते. मात्र, सातत्य, संयम व अभ्यासाच्या जोरावर त्याने २०२४ मध्ये थेट देशात ६३ वी रँक मिळवली.

प्रसाद याची नियुक्ती आता भारतीय वन सेवा अधिकाऱ्याच्या पदावर होणार आहे. त्याच्या यशाबद्दल गावातील ग्रामस्थ, शिक्षक आणि मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.

  • UPSC CSE 2024 Final Result PDF-UPSC निकाल जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *