पुणे – सासरच्या लोकांच्या सततच्या पैशांच्या मागण्या आणि शारीरिक, मानसिक त्रासामुळे एका तरुण विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील हडपसर भागात घडली असून, पीडित महिलेचा मृत्यू २०२३ मध्ये झाला होता. तीचा पती, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांनी तिच्याकडे सतत पैशांची मागणी केली होती, जी पूर्ण न केल्यास तिला छळले जात होते.
गौरी नावाच्या या तरुणीचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही महिने सर्व काही सुरळीत होते. मात्र, नंतर तिच्या सासरच्यांनी तिच्यावर आर्थिक व मानसिक दबाव आणायला सुरुवात केली. तिच्या आई-वडिलांकडून सतत पैसे आणण्याची मागणी होत होती. तिने तिच्या आई-वडिलांकडून काही वेळा पैसे आणले सुद्धा, मात्र मागण्या थांबल्या नाहीत.
गौरीने तिच्या आई-वडिलांकडे झालेल्या त्रासाबद्दल सांगितले होते. सासरच्या लोकांनी तिला काम करायला लावणे, मारहाण करणे आणि एकटं पाडणं अशा प्रकारे तिला सतत छळलं जात होतं. अखेरीस, तिने आत्महत्येचा मार्ग निवडला.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात पती आणि इतर सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
More Stories
अल्पवयीन मुलीवर अत्याचार: शेवगावमध्ये आरोपीस १० वर्षांची शिक्षा
हुंडा प्रथा बंदी मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय
ओडिशा लैंगिक अत्याचार १३ वर्षीय मुलीवर – आत्महत्येचा प्रयत्न!