NDA मधून महिला ऑफिसर्स | पहिल्यांदाच २७ महिला भारतीय लष्करात दाखल

NDA मधून महिला ऑफिसर्स | पहिल्यांदाच २७ महिला भारतीय लष्करात दाखल

पुणे (प्रतिनिधी):
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मधून पहिल्यांदाच महिलांची तुकडी पासआउट झाली असून, २७ महिला कॅडेट्सने यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून लष्करी सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. याआधी केवळ पुरुषांसाठीच NDAचा दरवाजा खुला होता, मात्र आता लष्करात स्त्री-पुरुष समानतेचा नवा अध्याय सुरु झाला आहे.

सध्याच्या १४८ व्या कोर्समध्ये एकूण ३५० कॅडेट्स होते, ज्यामध्ये २७ महिला आणि उर्वरित पुरुष होते. ३ वर्षांच्या कठीण प्रशिक्षणानंतर या महिला देशाच्या सेवेसाठी पुढे जात आहेत.

या महिलांना लष्करी सेवेत पुढील वाटचालीसाठी सेना, नौदल आणि वायुदलात विविध पदांवर नियुक्त केले जाणार आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे NDA मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणींना नवा आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाली आहे.

दिल्लीच्या कॅडेट ईशिता शर्मा हिने सांगितले की, “आम्हाला समान संधी मिळाल्याचा अभिमान वाटतो. देशाच्या सेवेसाठी आता महिला सक्षमपणे पुढे येतील.”

https://joinindianarmy.nic.in – Join Indian Army

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *