मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: मे हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2025 साठी हप्ता

मे महिन्याचा हप्ता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत महिलांच्या खात्यात जमा होतोय

मुंबई – राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ आता प्रत्यक्षात लाभार्थींना मिळू लागला आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यांमध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

अनेक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून, त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी महिलांनी आपले बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळते आहे आणि हे त्यांचं आर्थिक सशक्तिकरण करण्याचं पाऊल आहे.

राज्यातील हजारो महिलांना योजनेचा लाभ मिळत असून, शासन दर महिन्याला निवडलेल्या लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा करत आहे. महिला आणि किशोरींच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे.

https://www.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *