मे महिन्यात अतिवृष्टीमुळे ३४,८५२ हेक्टरवरील पीकांचे नुकसान

मुंबई:
मे महिन्यात अनेक भागांत अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यभरात सुमारे ३४,८५२ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. सर्वाधिक नुकसान अमरावती, जळगाव, नाशिक, जालन, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांत झाले असून, कांदा, आंबा, कडधान्य आणि भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

राज्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीपिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका उन्हाळी कांद्याला बसला आहे. नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड, धुळे, जालना, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, वाशिम, हिंगोली, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती अधिक तीव्र आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, शासनाकडून मदतीची मागणी जोर धरू लागली आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, येत्या काही दिवसांतही अस्थिर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकरी वर्ग आणखी अडचणीत येण्याची भीती आहे.

https://mausam.imd.gov.in

https://krishi.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *