हुंडा प्रथा बंदी मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय

हुंडा प्रथा बंदी मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय

पुणे (प्रतिनिधी) – वैवाहिक समारंभांमध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चासह हुंडा घेणाऱ्या कुटुंबांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड परिसरातील मराठा समाजाने घेतला आहे. एकत्रित बैठकीत ठराव करून अशा कुटुंबांशी कोणताही सामाजिक किंवा वैवाहिक व्यवहार न करण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत “रोटी-बेटी” व्यवहार म्हणजेच अन्न आणि विवाह नाते एकदम बंद करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. यासोबतच, फाजील खर्च, फटाके, डीजे आणि बडेजाव टाळून सध्या आणि साधेपणात विवाह समारंभ पार पाडण्यावर भर देण्यात आला.

या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि विवाह प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण आणि खर्चिक न बनता सुसंस्कृत पद्धतीने पार पडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

https://mohfw.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *