सिंहस्थ कुंभमेळा 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये अमृतस्नानाच्या तारखा जाहीर

सिंहस्थ कुंभमेळा 2026 नाशिक त्र्यंबकेश्वर अमृतस्नान

नाशिक, त्र्यंबकेश्वर | सिंहस्थ कुंभमेळा 2026 चा शुभारंभ 21 नोव्हेंबर 2024 रोजी ध्वजारोहणाने होणार असून, हा पर्वकाळ तब्बल 22 महिने चालणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या या कुंभमेळ्यातील प्रमुख अमृतस्नानाच्या तारखा अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

🔶 प्रमुख अमृतस्नानाच्या तारखा:

  • पहिलं स्नान: 14 जुलै 2026 (गुरुपौर्णिमा)
  • दुसरं स्नान: 11 ऑगस्ट 2026 (नागपंचमी)
  • तिसरं स्नान: 25 ऑगस्ट 2026 (राखी पौर्णिमा)
  • चौथं स्नान: 4 सप्टेंबर 2026 (कृष्ण अमावस्या)
  • पंचम स्नान: 14 सप्टेंबर 2026 (भाद्रपद शुद्ध दशमी)
  • शेवटचं स्नान: 24 जुलै 2028 (ध्वजारोहण समाप्ती)

या पर्वकाळात देशभरातील लाखो भाविक आणि साधूसंत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकत्र येतात. धार्मिक विधी, स्नान, कीर्तन, प्रवचने आणि संतांचे आशीर्वाद यामुळे या कालावधीला विशेष महत्त्व आहे.

🛕 सिंहस्थ कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य:

  • 12 वर्षांनी एकदा येणारा कुंभमेळा
  • ज्योतिषशास्त्रातील विशेष योगावर आधारित अमृतस्नान
  • अध्यात्मिक व धार्मिक वातावरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *