गगनयान मानवी अंतराळ मोहिम 2027: भारत अंतराळात मानव पाठवणार

गगनयान मानवी अंतराळ मोहिम 2027: भारत अंतराळात मानव पाठवणार

नवी दिल्ली – भारतासाठी आणखी एक गौरवाची बातमी पुढे आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची ‘गगनयान’ मानवी मोहिम आता अंतिम टप्प्यात आहे. इस्रोने जाहीर केल्याप्रमाणे, 2027 पर्यंत भारताचा पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवला जाईल.

ही योजना यशस्वी झाल्यास भारत अमेरिकेनंतर, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरेल ज्याने स्वतःच्या क्षमतेने मानवाला अंतराळात पाठवले आहे.

या मिशनमध्ये 7200 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून 3000 हून अधिक प्रयोग प्रगतीपथावर आहेत. लवकरच ‘गगनयान’चे प्रक्षेपणाचे अंतिम तपशील निश्चित केले जातील.

‘गगनयान’ हे भारताचे पहिले मानवी अंतराळ अभियान असून यात तीन अंतराळवीरांना अवकाशात नेण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या एलव्हीएम-3 रॉकेटद्वारे मानवी अवकाश उड्डाणासाठी तयारी सुरू आहे.

2025 मध्ये मानवरहित चाचणी मोहिम पार पडेल आणि 2027 मध्ये अंतिम मानवयुक्त प्रक्षेपण केले जाईल.

या मोहिमेद्वारे इस्रोने मानवाच्या अंतराळ प्रवासासाठी आवश्यक तंत्रज्ञान, यंत्रणा आणि जीवन सहाय्य प्रणालींची यशस्वी चाचणी घेतली आहे.

ISRO Official Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *