बीडमध्ये ६०६ पोलीस बदल्या – गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी मोठा निर्णय

बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत मोठा फेरफार करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्याचे एसपी बदलले तरी, खाली काम करणारी यंत्रणा पूर्ववतच होती. त्यामुळे गुन्हेगारीचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच होता आणि शिवराज दिवटे प्रकरण देखील घडले.

या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील ६०६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या बदल्यांमुळे स्थानिक गुन्हेगारीच्या समस्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अधिकाऱ्यांमध्ये काहीजण मर्जीतले आणि स्वजातीतील गुन्हेगारांची पाठराखण करणारे होते, ज्यामुळे पोलीस यंत्रणा प्रभावी काम करण्यात अडथळा येत होता. आता या मोठ्या बदल्यांनंतर जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

बीड पोलिसांचे हे बदल प्रशासनाच्या गुन्हेगारी नियंत्रण धोरणाचा भाग असून, या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना न्यायालयीन आणि कायदेशीर मदत अधिक प्रभावीपणे मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *