२०२५ हे वर्ष शुभ घटनांनी भरलेले राहणार आहे. मंगळ ग्रहाचा प्रभाव देशाच्या दक्षिण भागात अधिक पावसाचे प्रमाण घेऊन येईल, असा विश्वास ज्योतिषाचार्य डॉ. प्रणाम सागर महाराज यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूर येथे आयोजित जैन मंदिराच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. महाराजांनी सांगितले की, येणारे वर्ष राजकीयदृष्ट्या स्थिरतेचे राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात राहील आणि सत्तेतील सातत्य कायम राहण्याची शक्यता आहे.
पावसाच्या दृष्टीने दक्षिण भागात समाधानकारक स्थिती असेल आणि अनेक प्रादेशिक संकटे दूर होतील. डॉ. प्रणाम सागर यांनी विज्ञानाच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्राला आधार देत सांगितले की, ते अंधश्रद्धा नसून ग्रहांची स्थिती आणि ऊर्जा यावर आधारित विज्ञान आहे.
त्यांनी स्पष्ट केले की खडे घालण्यामागे मानसिकता समजून घेतली पाहिजे. कोणतीही गोष्ट अंधश्रद्धेपेक्षा वैचारिक मंथनातून समजून घेणे आवश्यक आहे.
