India Pinaka MK3: भारताच्या संरक्षण क्षमतेत लवकरच भर पडणार आहे. दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी ‘पिनाका’ रॉकेट प्रणाली आता नव्या अद्ययावत ‘MK3’ स्वरूपात भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
‘ऑपरेशन सिंधू’ दरम्यान यशस्वीपणे वापरण्यात आलेल्या या शस्त्राचा वापर अनेक वेळा पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या घुसखोरीला रोखण्यासाठी झाला आहे. ही रॉकेट सिस्टिम फार कमी वेळात मोठा परिणाम साधण्याची क्षमता बाळगते. MK3 व्हर्जनमध्ये ती आणखी घातक बनली आहे. यात 3 वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट्स आणि मल्टिपल लॉन्चरचा समावेश आहे.
नवीन पिनाका MK3 ची रेंज 45 किमीपासून ते 120 किमीपर्यंत असून, भविष्यात ती 300 किमीपर्यंत नेण्याची शक्यता आहे. यामध्ये अत्याधुनिक नेव्हिगेशन, गाईडन्स, वॉरहेड आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम्सचा वापर करण्यात आला आहे.
या शस्त्रामुळे पाकिस्तानसह चीनसारख्या देशांना स्पष्ट संदेश दिला जाणार आहे की भारत आता त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. पिनाका MK3 भारतीय लष्करातील मोठा गेमचेंजर ठरेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
https://mod.gov.in

One thought on “पिनाका MK3 रॉकेट प्रणाली भारतीय लष्करात; 1 मिनिटात शत्रूला प्रत्युत्तर”