‘एक रुपयात पीकविमा’ योजना बंद; शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

एक रुपयात पीकविमा

सोलापूर – राज्य सरकारच्या ‘एक रुपयात पीकविमा’ योजनेला यंदा ब्रेक लागल्याने सुमारे 70 लाख शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मागील वर्षी या योजनेतून 112 कोटी रुपयांचे पीकविमा संरक्षण मिळाले होते. मात्र, यावर्षी योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर तब्बल 3,500 रुपये भरावे लागत आहेत.

गेल्या वर्षी फक्त एक रुपयात विमा मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. यावर्षी या योजनेला स्थगिती दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विमा भरणं टाळलं आहे, ज्यामुळे निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळणं कठीण झालं आहे.

उडीद, मूग, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांसाठी पीकविमा अत्यावश्यक आहे. या योजनेच्या रद्दीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यावर लवकरच तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *