सिन्नरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बसस्थानकाची स्लॅब कोसळली

सिन्नर (जि. नाशिक):
रविवारी रात्री सिन्नर शहर व परिसरात जोरदार पावसाने थैमान घातले. या मुसळधार पावसामुळे बसस्थानकाच्या इमारतीवरील स्लॅब कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले असून वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. ढगफुटीला साम्य असणाऱ्या या पावसाने काही वेळातच शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *