शनिशिंगणापूर दर्शन बंद: ११ जूनपासून रात्री १०:३० ते पहाटे ४ पर्यंत मंदिर बंद

शनिशिंगणापूर मंदिर दर्शन बंद सूचना – ११ जून २०२५

शनिशिंगणापूर (प्रतिनिधी): श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे ११ जूनपासून रात्री १०:३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत शनीमंदिरात दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासन, देवस्थान समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्तरित्या हा निर्णय घेतला असून भाविकांची सुरक्षितता आणि योग्य व्यवस्थापन यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

श्री शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भास्कर बानकर यांनी या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यामुळे रात्रीच्या काळात मंदिर परिसर बंद राहणार असून भाविकांनी नियोजन करूनच दर्शनासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गावकऱ्यांना दर्शनासाठी आधारकार्ड बंधनकारक केले असून, सकाळी ४ पासून ते दुपारी आणि संध्याकाळी दर्शनासाठी वेळ निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये एक तास आधी व एक तास नंतर असा कालावधी दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Shani_Shingnapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *