संगमनेर अवैध धंदे बंद करण्याचे आदेश – आमदार खतात

संगमनेर अवैध धंदे वर पोलिसांची कारवाई

संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंदे व अनधिकृत कत्तलखान्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आमोल खतात यांनी शहर, तालुका व घारगाव पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत सर्व अवैध धंदे बंद करून अनधिकृत कत्तलखाने उदध्वस्त करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुशल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, तालुका निरीक्षक देविदास घायाळ, घारगावचे निरीक्षक विलास पुरी आदी अधिकारी उपस्थित होते.

आमदार खतात यांनी सांगितले की, मटका, जुगार, अवैध दारू, अंमली पदार्थ, सट्टी, ऑनलाईन लॉटरी यांसारखे अवैध व्यवहार शहरात सुरू असून, पोलिसांनी अशा ठिकाणांवर लक्ष ठेवून त्वरित कारवाई करावी. यापुढे गुन्हे दाखल न करता संबंधितांवर थेट कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन आमदार खतात यांनी केले.
यावेळी पोलिसांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आणि कारवाईची माहिती नियमितपणे देण्याचे निर्देश देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *