रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी

रत्नागिरी, ता. २७: कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या भागांसाठी रेड अलर्ट पावसामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही तासांत पावसाचा जोर अधिक वाढू शकतो.

यामुळे संबंधित प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून, नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *