निफाड घरफोडी चोर अटक प्रकरणात मोठा खुलासा; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निफाड शहरातील छत्रपती संभाजीनगर परिसरात रविवारी (दि. २५ मे) रात्रीच्या सुमारास एका घरात घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात निफाड पोलिसांनी तत्परतेने तपास करून दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १२ लाख १९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रात्रीच्या सुमारास किरन चंद्रकांत अहिरे यांच्या घरात चोरी झाल्यानंतर त्यांनी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विशाल संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे पथकाने नाशिकच्या अडगाव भागातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे दयानंद गरड (वय ३२) आणि त्यांचा साथीदार. पोलिसांनी त्यांच्या कडून ११ तोळे सोनं, चांदीचे दागिने, एक कार, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांनी पिंपळद सिन्नर परिसरातही चोरी केल्याची कबुली दिली असून, त्यांच्यावर यापूर्वी देखील विविध पोलीस ठाण्यां

https://www.mahapolice.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *