NEET 2025 परीक्षा पुढे ढकलली – एकाच शिफ्टमध्ये होणार नवी परीक्षा

NEET 2025 परीक्षा पुढे ढकलली – एकाच शिफ्टमध्ये होणार नवी परीक्षा

नवी दिल्ली: वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी NEET 2025 परीक्षा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने हा निर्णय घेतला आहे.

या पूर्वी NEET परीक्षा 15 जून रोजी दोन स्वतंत्र सत्रांमध्ये होणार होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतल्याने आणि न्यायालयात याबाबत याचिका दाखल केल्याने बोर्डाने आता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन अपडेटनुसार, आता NEET परीक्षा एकाच सत्रात (शिफ्टमध्ये) घेतली जाणार आहे. नॅशनल बोर्डने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून, नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवून पुढील सूचना वाचाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशनची वेबसाइट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *