अहमदाबाद, मे २५, २०२५:
IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळताना चाहत्यांचं लक्ष पुन्हा एकदा आपल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे वळवलं. नरेंद्र मोदी स्टेडियमवर टॉसवेळी धोनीने निवृत्तीविषयी विचारले असता थोडा भावूक होत म्हणाला की, “माझं शरीर अजून साथ देतंय. दरवर्षी हे एक नवीन आव्हान असतं आणि त्यासाठी शरीराची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे.”
धोनीच्या या वक्तव्यावरून स्पष्ट झालं की, सध्या तरी त्याच्या निवृत्तीची शक्यता नाही.
चेन्नई सुपर किंग्जचा हंगाम विशेष राहिला नाही. त्यांनी 13 पैकी फक्त 3 सामने जिंकले आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले. यामध्ये खेळाडूंच्या दुखापतींनी संघाला मोठा फटका बसला. ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा घेतली, पण संघ पुनरागमन करू शकला नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर, धोनीच्या खेळात कायम राहण्याच्या संकेतांनी त्याचे चाहते खूश झाले आहेत.
https://www.espncricinfo.com
