महाराष्ट्र कोविड-१९ २०२५ अपडेट: ४७ नवीन रुग्ण, ४ मृत्यू नोंद

महाराष्ट्रात कोविड-१९च्या रुग्णसंख्येत वाढ दिसून आली आहे. महाराष्ट्र कोविड-१९ अपडेट २०२५ नुसार, शनिवारी राज्यात ४७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १६६ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ३०, पुण्यात ७, ठाण्यात ६, नवी मुंबईत ३ आणि नागपूरमध्ये १ नवीन रुग्ण आढळले आहेत .

राज्यात आतापर्यंत ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. ठाण्यातील २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, त्याला मधुमेहाचा गंभीर त्रास होता. कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला . अन्य तीन मृत्यूंच्या घटनांमध्येही रुग्णांना इतर गंभीर आजार होते.

आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि सामाजिक अंतर राखणे या उपाययोजना पुन्हा एकदा महत्त्वाच्या ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *