लातूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरू

लातूर – शहरातील बहुचर्चित ड्रग्स प्रकरणाचा मुख्य संशयित अनुज नवनाथ सोनवणे हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही. शहरातल्या विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत असून तो ओळखीच्या व्यक्तींकडे लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

22 मे रोजी अनुजला 600 ग्रॅम मेफेड्रॉन (MD) ड्रग्ससह अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *