पिकांची किमान हमी किंमत 2025 – कापूस ₹७७००, सोयाबीन ₹५३२८

पिकांची किमान हमी किंमत 2025 – कापूस ₹७७००, सोयाबीन ₹५३२८

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा योजना – १४ पिकांच्या MSP मध्ये वाढ

नवी दिल्ली: केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025-26 साठी १४ प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ जाहीर केली आहे. यात कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर आणि इतर पिकांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर अधिक नफा मिळण्यास मदत होणार आहे.

नवीन MSP प्रमाणे काही मुख्य पिकांचे दर पुढीलप्रमाणे असतील:

  • सोयाबीन: ₹५३२८ प्रति क्विंटल (वाढ: ₹२०)
  • कापूस (मध्यम): ₹७०७० प्रति क्विंटल (वाढ: ₹५०)
  • कापूस (लांब): ₹७७०० प्रति क्विंटल (वाढ: ₹५५)
  • ज्वारी (हायब्रीड): ₹३२३८ प्रति क्विंटल (वाढ: ₹११८)
  • बाजरी: ₹२५९० प्रति क्विंटल (वाढ: ₹१५०)

केंद्र सरकारने यापूर्वी ठरवलेल्या उत्पादन खर्चावर आधारित MSP ठरवले आहे. हे दर शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे मानले जात असून, त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हातभार लागेल.

किसान क्रेडिट कार्ड योजना लवकरच सुरू

याव्यतिरिक्त, सरकारने 2025-26 मध्ये शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनाही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी व्याजदराने कर्ज मिळणार आहे.

https://pib.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *