कोविड रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; घसा बसणे, अतिसार व ताप सामान्य लक्षणं

गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये कोविडशी संबंधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या रुग्णांमध्ये आढळणारी प्रमुख लक्षणे म्हणजे – घसा बसणे, कोरडा खोकला, सौम्य ताप, पाणचट अतिसार आणि पोटदुखी.

विशेषतः JN.1, NB.1.8.1 आणि LF.7 या ओमिक्रॉनच्या उपप्रजाती सध्या सक्रिय आहेत. या प्रकारांमध्ये संसर्ग होण्याचा वेग अधिक असला तरी गंभीर लक्षणांची तीव्रता कमी आहे. मात्र, ज्यांना मधुमेह, दम्याचे विकार, किंवा कमजोर प्रतिकारशक्ती आहे तसेच वृद्ध आणि लहान मुलांसाठी धोका अधिक आहे.

डॉ. प्रदीप बजाड (अमृता हॉस्पिटल, फरीदाबाद) यांनी सांगितले की, “गेल्या १० दिवसांत ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या ३ ते ४ पट वाढली आहे, जरी आयसीयूमध्ये गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे.”

सामान्य लक्षणांमध्ये सौम्य ताप, घसा खवखवणे, सर्दी, थकवा, स्नायूंमध्ये वेदना, डोकेदुखी, आणि जुलाब हे आहेत. अनेकांना ३ ते ४ दिवसांत आराम मिळतो. विशेष लक्षण म्हणजे घसा बसणे आणि पाणचट अतिसार हे लक्षवेधी झाले आहेत.

डॉ. सुरंजीत चॅटर्जी (इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल) यांच्या मते, “अनेक रुग्ण पाणचट जुलाब व थकवा घेऊन येतात, जे कोविडचे सूचक असू शकते. त्यामुळे अशा लक्षणे आढळल्यास कोविड टेस्ट करणे गरजेचे आहे.”

गंभीर लक्षणे फारशा आढळत नसली, तरी ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व लहान मुलांनी काळजी घेणं आवश्यक आहे. मास्क वापरणे, गर्दीपासून दूर राहणे आणि स्वच्छता राखणे ही खबरदारी उपयुक्त ठरते.

https://www.mohfw.gov.in

https://www.who.int

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *