अहिल्यानगर लग्न आचारसंहिता: मराठा समाजाने स्थापन केली सुचना समिती

अहिल्यानगर लग्न आचारसंहिता

अहिल्यानगर | प्रतिनिधी
मराठा समाजाच्या पुढाकारातून अहिल्यानगरमध्ये लग्न समारंभासाठी शिस्तबद्ध आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अमळवजावणी आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सुचना समिती स्थापन करण्यात आली असून, यामुळे समाजात नवीन शिस्त आणि आदर्श निर्माण होणार आहे.

लग्न समारंभ अधिक शिस्तबद्ध, साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने पार पाडावेत, यासाठी या आचारसंहितेतील नियम पुढे आले आहेत. वाजंत्री, फटाके, सनई-चौघडा, डीजे आणि इतर गोंगाटपूर्ण संगीत टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, समारंभात उशीर न करता वेळेवर सर्व विधी पार पाडण्याचा आग्रह धरला आहे.

विशेष म्हणजे, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक मंडळात सुचना समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती स्थानिक पातळीवर लग्न समारंभात नियमांचे पालन होत आहे की नाही, हे तपासणार आहे.

या निर्णयामुळे मराठा समाजात सामाजिक शिस्त आणि आर्थिक शहाणपणाचे उदाहरण उभे राहिले आहे. इतर समाजांनाही याचा आदर्श घ्यावा, अशी प्रतिक्रिया समाजात उमटत आहे.

One thought on “अहिल्यानगर लग्न आचारसंहिता: मराठा समाजाने स्थापन केली सुचना समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *