WWDC 2025 Apple AI घोषणांमध्ये घट, कार्यक्रम लहान स्वरूपात

Apple WWDC 2025 चा अधिकृत लोगो

कॅलिफोर्निया | २ जून २०२५:
ॲपलची वार्षिक Worldwide Developers Conference (WWDC) 2025 या वर्षी लहान स्वरूपात पार पडणार असल्याची शक्यता आहे. यंदा हार्डवेअरच्या मोठ्या लॉन्चची अपेक्षा नाही, तसेच AI संदर्भातील नवकल्पनाही मर्यादित असतील, असे रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

AI क्षेत्रातील स्पर्धेत ॲपल मागे?
Bloomberg च्या मार्क गुरमन यांच्या अहवालानुसार, ॲपल सध्या AI क्षेत्रात Google आणि OpenAI यांच्याशी स्पर्धा करत आहे. मात्र कंपनी अजूनपर्यंत मोठ्या AI प्रगतीबाबत खुलासा केलेला नाही. त्यामुळे यावर्षीच्या WWDC मध्ये AI घोषणांची संख्या मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2025 मध्ये कोणते हार्डवेअर लाँच होणार?
WWDC 2023 मध्ये Vision Pro आणि AI संबंधित अनेक प्रगत तंत्रज्ञान दाखवण्यात आले होते. मात्र यंदा 2025 मध्ये कोणतेही “वन मोअर थिंग” प्रकारचं आश्चर्यकारक हार्डवेअर सादर होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. या वर्षीचा फोकस VisionOS-inspireड सॉफ्टवेअर फीचर्सवर, SwiftUI अपडेट्सवर आणि Swift Assist वर असणार आहे.

विकसकांसाठी संधी
जरी हार्डवेअर लाँच मर्यादित असले तरी, WWDC 2025 मध्ये ॲपलने विकसकांसाठी नव्या API, डेव्हलपमेंट टूल्स, आणि सॉफ्टवेअर अपडेट्स सादर करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *