अभिजीत विष्णू यांचा नवा जागतिक धाव विक्रम
नाशिक (प्रतिनिधी) – पेशाने शिक्षक असलेले नाशिकचे अभिजीत विष्णू यांनी धावण्याच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा सुमारे ३८०० किलोमीटरचा प्रवास केवळ २७ दिवस, १३ तास आणि २२ मिनिटांत पूर्ण केला आहे.
त्यांच्या या विक्रमी प्रवासामुळे ‘स्ट्रीट्स ऑफ इंडिया’ उपक्रमाअंतर्गत नोंद करण्यात आली असून त्यांनी जगभरात नवा आदर्श निर्माण केला आहे.
या अविश्वसनीय धावप्रवासात त्यांनी दररोज सरासरी १४० किलोमीटर अंतर पार केले. त्यांच्या मार्गामध्ये हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटका आणि तामिळनाडूसारख्या राज्यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, श्रीनगरमधून १ मे रोजी त्यांनी धावण्यास प्रारंभ केला आणि २७ मे रोजी कन्याकुमारी गाठली. दरम्यानच्या प्रवासात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अनेक सामाजिक संघटनांनी गौरव केला.
स्वागत समारंभात अभिमान
२७ मे रोजी शिरसाट फाट्यावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष भिकू उगले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच विविध संस्थांच्या प्रमुखांनी त्यांचा सन्मान केला.
या वेळी डॉ. अनंत जाधव, संजय साळवे, संतोष वडूळे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धावण्याविषयी अधिक जाणून घ्या Runners World
