मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून देशभरातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता ३ वीपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत शिकवणे अनिवार्य करण्यात येणार आहे.
हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या अंमलबजावणीचा एक भाग आहे. मातृभाषा वा स्थानिक भाषेमध्ये शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचे बौद्धिक विकास अधिक प्रभावी होतो, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, विचारशक्ती आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.
- https://www.education.maharashtra.gov.in/-महाराष्ट्र शिक्षण विभाग
