भारत गौरव ट्रेन : ९ जूनपासून पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसा स्थळांचा अनुभव

मुंबई: भारतीय रेल्वेच्या खानपान व पर्यटन विभागाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी जोडलेल्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज सर्किट”च्या विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही भारत गौरव ट्रेन ९ जून २०२५ पासून आपला प्रवास सुरू करणार आहे.

या अनोख्या सफरीमध्ये महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा थेट अनुभव घेण्यासाठी पर्यटकांना ही अनमोल संधी मिळणार आहे.

प्रवास मार्ग:

मुंबई – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई

प्रमुख स्थळांचा समावेश:

  • रायगड किल्ला: शिवरायांच्या राज्याभिषेक स्थळाचे दर्शन
  • शिवनेरी किल्ला: शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण
  • लाल महाल, पुणे: शिवाजी महाराजांचे बालपण
  • कसबा गणपती व शिवश्री, पुणे: शिवरायांच्या जीवनाशी आत्मियत्त्व
  • भीमाशंकर ज्योतिर्लिंग: १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक
  • प्रतापगड किल्ला: अफझलखान पराभवाचे ऐतिहासिक साक्षीदार
  • कोल्हापूर: महालक्ष्मीचे मंदीर
  • पन्हाळा किल्ला: ऐतिहासिक शौर्य आणि रक्षणाचा वारसा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *