जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चत्रू येथील सिंहपोरा भागात सुरक्षा दलांनी अतिरेक्यांविरुद्ध मोहीम सुरू केली असून, तिघाजण अतिरेकी या भागात अडकल्याची शक्यता आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी सकाळी दिली.
सुरक्षा दलांनी अतिरेक्यांच्या उपस्थितीबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर त्या परिसरात शोधमोहीम आणि घेराव टाकण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.
ही चकमक अशा वेळी सुरू झाली आहे जेव्हा भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले होते. त्यानंतर ८, ९ आणि १० मे रोजी पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता, ज्याला भारताने ठाम प्रत्युत्तर दिले.
